बेकायदा गावठी पिस्टल बाळगणा-यास अटक

On: January 2, 2023 6:39 PM

जळगाव : बेकायदा गावठी पिस्टल बाळगणा-या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा येथून अटक केली आहे. अजित गुजर बारेला (रा. रंगराव आबा नगर मल्हारपुरा चोपडा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून तिस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल, एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील हे.कॉ. संदिप पाटील, गोरख बागुल, पो.ना. प्रविण मांडोळे, परेश महाजन आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना समजलेल्या माहितीच्या आधारे चोपडा शहरातील भाऊ हॉटेल परिसरातून अजित बारेला यास गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली आहे. त्याला पुढील कारवाईकामी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment