खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

On: January 3, 2023 7:07 PM

जळगाव : जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत काही दिवसांपुर्वी झालेल्या खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. विजयसिंग फुलसिंग पारधी रा. जैनाबाद जळगाव असे  अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हा घडल्यापासून विजयसिंग उर्फ विजु पारधी हा फरार होता. विजु पारधी हा त्याच्या घरी जैनाबाद येथे आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्याला जैनाबाद परिसरातील विठ्ठल मंदिराच्या मागे असलेल्या पुलाजवळून अटक करण्यात आली. पुढील तपासकामी त्याला जळगाव शहर  पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश चौबे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, पोना विजय पाटील, नितीन बावीस्कर, अविनाश देवरे, प्रितम पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील आदींसह जळगाव शहर पोलिस स्टेशनचे हे.कॉ. संजय भांडारकर, पोकॉ. रतन गिते आदींनी या  तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment