पोलीसांसाठी योगा हार्टफूलनेस कार्यक्रम

On: January 4, 2023 7:26 PM

जळगाव : महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमीत्त हार्टफूलनेस संस्थेच्या वतीने पोलिस अधिकारी व कर्मचा-यांसाठी दिनांक 4, 5 व 6 रोजी  योगा हार्टफूलनेस मेडिटेशनचे तीन परिचयात्मक सत्र आयोजित करण्यात आले आहे. पोलिसांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी रिलॅक्सेशन व ध्यान करतांना सुमारे 150 पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक (गृह) संदीप गावित आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील आदींचे यावेळी सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक सोनवणे, पोलीस उप निरीक्षक रावसाहेब गायकवाड, सहायक पोलीस उप निरीक्षक देविदास वाघ, पोलीस हवालदार सतीश देसले आदींनी यावेळी परिश्रम घेतले. हार्टफूलनेस संस्थेच्या वतीने डॉ. नीलम अग्रवाल, डॉ. प्रभावती महाजन, के. डी. चौधरी दत्ता जोशी, आदींनी यावेळी मार्गदर्शन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment