ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा पोलीस जलतरण तलाव खेळाडूंची निवड

जळगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा 2023 या दिनांक 1 ते 12 जानेवारी 2023 यादरम्यान संपन्न होत आहेत. यात मॉडर्न पेटयथलॉन, वॉटर पोलो, ट्रायथलॉन स्पर्धा पुणे बालेवाडी येथे होत आहेत. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातर्फे पोलीस जलतरण तलाव खेळाडूंची निवड झाली आहे. यामधे वॉटर पोलो पुरुष संघात अमेय नगरकर, ओम चौधरी, तलाह सिद्दिकी, हर्षवर्धन महाजन व टीम व्यवस्थापक हिदायत खाटीक यांचा समावेश आहे.

मॉडर्न पेटयथलॉन पुरुष संघात अमेय नगरकर, तलाह सिद्दिकी, हर्षवर्धन महाजन, ओम चौधरी, अयान शेख, लाजरी खाचणे, धनश्री जाधव, जान्हवी महाजन, टिम व्यवस्थापक सौ. कुमुदिनी खाचणे, सौ दिपाली महाजन, कोच गजानन महाजन, रवींद्र चौधरी आदींचा समावेश आहे. ट्रायथलॉन संघात महिला धनश्री जाधव, टिम व्यवस्थापक राजीव जाधव आदींचा समावेश आहे.

या स्पर्धेसाठी तांत्रिक पंच म्हणून  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन यांच्या कडून कमलेश नगरकर, जयंत चौधरी, सुरज दायमा यांची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here