एस. पी. बालसुब्रमण्यम व्हेंटीलेटरवर

On: August 16, 2020 1:28 PM

चेन्नई : प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम (७४) यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

एस. पी. बालसुब्रमण्यम यांना ५ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरीच विलगीकरण होण्याचा सल्ला दिला होता. मात्र परिवाराच्या काळजीने त्यांनी स्वत:ला रुग्णालयात दाखल केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment