अत्याचारातून मतीमंद तरुणी गर्भवती

On: January 14, 2023 10:17 AM

जळगाव : शेतमजुरी करणा-या मतीमंद तरुणीवर झालेल्या अत्याचारातून ती तिन महिन्यांची गर्भवती झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा येथे शेतमजुरी करणारे कुटूंब शेतात जात होते. दरम्यानच्या कालावधीत मतीमंद तरुणी घरात एकटी रहात असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अज्ञाताने वेळोवेळी अत्याचार केला. त्यातून ती  तिन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले आहे. तरुणीचे पोट दुखत असल्याचे तिच्या आईला समजल्यानंतर तिने तिला पारोळा येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले असता हा प्रकार उघड झाला. अधिक उपचारार्थ तिला धुळे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक गंभीर शिंदे करत आहेत.     

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment