जळगाव : पतंग उडवत असतांना दहा वर्षाच्या बालकाचा तोल जावून विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज धरणगाव तालुक्यातील हिंगोणे या गावी घडली. इयत्ता पाचवीत शिकणारा अक्षय संजय महाजन (माळी) असे या बालकाचे नाव आहे.
अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील मुळ रहिवसी असलेला महाजन परिवार कामधंद्यानिमीत्त धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे स्थायीक झाला होता. मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वत्र पतंग महोत्सव साजरा केला जात असतांना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे धरणगावसह अमळनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती समजताच गावक-यांनी घटनास्थळी धाव घेत अक्षयला विहीरीतून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.







