म.रा. पोलीस क्रीडा स्पर्धेत जळगाव पोलिस दलाची चमकदार कामगिरी

On: January 17, 2023 7:41 PM

जळगाव : पुणे येथे 7 ते 13 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य पोलिस क्रिडा स्पर्धा 2023 संपन्न झाल्या. या स्पर्धेत बॉक्सिंगमधे संतोष सुरवाडे यांनी सुवर्ण पदक तर प्रशांत सोनार यांनी रौप्य पदक प्राप्त केले. समीर सय्यद यांनी बास्केटबॉल मध्ये रौप्य पदक प्राप्त केले. शरीरसौष्ठव स्पर्धेत रवींद्र वंजारी आणि जागृती काळे यांनी  रौप्य पदक प्राप्त केले. पंकज रामचंद्र शिंदे आणि सुनिल मोरे यांनी वुशू मध्ये कास्य पदक प्राप्त केले. पदक प्राप्त करणा-या खेळाडूंची राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.

सर्व स्पर्धकांचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपाधीक्षक (गृह) संदीप गावित व राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी 42 किमी मॅरेथॅान स्पर्धेत सहभाग नोंदवल्याबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक (गृह) संदीप गावित यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment