प्रणव मुखर्जी अद्याप व्हेंटिलेटरवरच

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर असली तरी अजूनही ते व्हेंटिलेटरवरच आहेत. या बाबतची माहिती आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलच्या वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे.

अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थीर असल्याची माहिती त्यांची मुलगी व काँग्रेसच्या नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटले आहे. काही दिवसांपासून प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीच्या अफवा पसरवल्या जात होत्या. प्रणव मुखर्जी प्रसाधनगृहात पडले होते. त्यामुळे त्यांच्या मेंदूवर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here