जळगाव : लबाडीने विश्वास संपादन करुन पर्सनल लोनच्या रकमेसह खात्यातील इतर रकमेसह एकुण 7 लाख 60 हजाराची रक्कम खात्यावर ऑनलाईन वळती करुन घेतल्याप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलींद प्रकाश पाटील हा अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील तरुण नोकरीनिमीत्त पुणे येथे राहतो. 18 व 19 जानेवारी दरम्यान मिलींद पाटील याच्या मोबाईलवर अज्ञात इसमाचा फोन आला. पलीकडून बोलणा-या अज्ञात तरुणाने मिलींद यास पर्सनल लोनसह क्रेडीट कार्डची माहिती आणि ऑफरसंबंधी तपशील सांगितला. पलीकडून बोलणा-याने मिलींदचा विश्वास संपादन केला.
पलीकडून बोलणा-या इसमावर विश्वास ठेवत मोबाईलवर आलेला ओटीपी मिलींदने पलीकडून बोलणा-या इसमाला सांगितला. मिलिंदच्या खात्यावर आलेली 6 लाख 69 हजार 260 रुपयांची पर्सनल लोनची रक्कम तसेच त्याच्या खात्यावर अगोदर असलेले 90 हजार 740 रुपये अशी एकुण 7 लाख 60 हजाराची रक्कम परस्पर पंजाब नॅशनल बॅंकेच्या खात्यात वर्ग करुन घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मिलींदने सायबर पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे पुढील तपास करत आहेत.