फेसबुकवर मैत्री, भेट संबंधातून झाली गरोदर!– पिडीतेने गुन्हा दाखल केला ठोकरे खात दरदर!!

On: January 22, 2023 1:03 PM

जळगाव : दोन मुलांची आई असलेली महिला फेसबुकवर तिच्यापेक्षा कमी वयाच्या तरुणाच्या प्रेमात पडली. फेसबुकवरील मैत्रीतून ती त्याच्या संपर्कात आली व त्यातून गर्भवती झाली. तिला गर्भवर्ती करुन तो पळून गेल्याचे लक्षात आल्यानंतर तिने भडगाव पोलिस स्टेशन गाठत आपली कैफीयत मांडली. या घटनेप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजरात राज्याच्या नवसारी जिल्ह्यातील महिलेचे यापुर्वी दोन लग्न झाले आहेत. पहिला पती तिला सोडून गेला. दुस-या पतीचे लग्नानंतर निधन झाले. तिला आठ वर्षाचा एक मुलगा आणि पाच वर्षाची मुलगी आहे. अशा परिस्थितीत तिची फेसबुकवर भडगाव येथील एका तरुणासोबत मैत्री झाली. या मैत्रीत ती त्याच्यासोबत चॅटींग करु लागली. बघता बघता दोघे एकमेकांना आपले सुख दुख: कथन करु लागले.

भडगाव येथील त्या तरुणाने तिच्या दुखा:वर हळूच फुंकर मारली आणि तिची उमेद जागी झाली. सागराप्रमाणे अथांग प्रेम करणा-या भडगावच्या त्या तरुणाच्या प्रेमात ती पडली. दोघे प्रत्यक्षात एकमेकांच्या भेटीत आले. त्या तरुणाने तिला कधी त्याच्या भडगाव येथील राहत्या घरी तर कधी नाशिक येथे बोलावले. ती देखील त्याच्या प्रेमात दिवानी झाल्याने त्याच्यासोबत शरीरसंबंध करुन बसली. त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध करतांनाचे फोटो काढून ते मित्रांना मोबाईलने पाठवले.

सलग दोन वर्षापासून सुरु असलेल्या या संबंधानंतर तो तरुण नॉट रिचेबल झाला. आपली फसवणूक झाल्याचे तिला वाटू लागले. आपल्याला गरोदर करुन पलायन करणा-या त्या तरुणाची तिने पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांची भेट घेत व्यथा कथन  केली. या प्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला बलात्कारासह आयटी अ‍ॅक्ट व इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.नि. अशोक उतेकर करत  आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment