तलवार उगारत महिलेचा पतीसमक्ष विनयभंग

On: January 23, 2023 11:18 AM

जळगाव : आपल्या पत्नीबाबत बरे वाईट बोलणा-या इसमास समजावण्यास गेलेल्या पतीला तलवार दाखवत त्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना चोपडा तालुक्यात घडली. या घटनेप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला विनयभंगासह शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्याच्या गावातील एका विवाहीतेबाबत पवन नामक इसम बरे वाईट बोलत होता. आपल्या पत्नीबद्दल बरे वाईट बोलत असल्यामुळे तिचा पती बाहेर येत पवन यास समजावू लागला. मात्र पवन याने हातात तलवार घेत त्या महिलेच्या घरी जावून आरडाओरड सुरु केली. याशिवाय त्या महिलेचा हात धरुन तु मला आवडतेस असे म्हणू लागला. विवाहीतेच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वक्तव्य करत हातातील तलवार उगारुन आरडाओरड सुरु केली. या प्रकारामुळे विवाहितेचे नातेवाईक व गावकरी जमा झाले.

जमलेल्या लोकांनी पवन याच्या तावडीतून महिलेची सुटका केली असता त्यांच्यावर देखील पवन याने तलवार उगारत जीवे ठार करण्याची धमकी दिली. या घटनेप्रकरणी विवाहीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर  पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. जितेंद्र सोनवणे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment