अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध – भडगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

On: January 25, 2023 10:19 AM

जळगाव : अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध करणा-या भडगाव येथील तरुणाविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय दशरथ पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सोळा वर्षाच्या तरुणीने भडगाव पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार त्याने तिचा वेळोवेळी पाठलाग केला. पाठलाग करुन त्याने तिला त्याच्यासोबत बोलण्यास भाग पाडून तिला भडगाव येथील एका  हॉटेलच्या रुमवर नेले. त्या रुमवर त्याने तिच्यासोबत शरिरसंबंध केले. तसेच तिला पाचोरा रेल्वे स्टेशनला मोटार सायकलवर बसवून नेले.

ती मुलगी मामाच्या घरी  जळगावला आली असता तो देखील तिच्या मागावर गेला. तिला सोबत पळून जाण्याचा इशारा करुन तो पळून गेला. गेल्या वर्षभरापासून झालेल्या या तिन विविध घटनेप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेया फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार गणेश वाघमारे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment