आजचे राशी भविष्य (16/2/2023)
मेष : आळस झटकून कामाला सुरुवात करावी लागेल. आर्थिक समस्या मार्गी लागतील.
वृषभ : वागण्या-बोलण्यात नम्रता ठेवावी लागेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
मिथुन : पैशाचा विनियोग योग्य रितीने कराल. विरोधक अप्रत्यक्षपणे कौतुक करतील.
कर्क : कृतीतून आपली हिम्मत दिसून येईल. आर्थिक आघाडीवर यश मिळेल.
सिंह : लहान मोठे प्रवास घडतील. कुणाच्या वादात पडणे योग्य होणार नाही.
कन्या : कष्टाला नशिबाची साथ योग्य रितीने मिळेल. अध्यात्मिक आवड निर्माण होईल.
तुळ : मानसिक स्थिती स्थिर ठेवावी लागेल. काही ठिकाणी तडजोड करावी लागतील.
वृश्चिक : जवळच्या व्यक्तीसोबत मनमोकळ्या गप्पा होतील. समाधान व शांतता लाभेल.
धनु : विद्यार्थी वर्गाला अभ्यासात मेहनत घ्यावी लागेल. उत्पन्नाचे नविन स्त्रोत मिळू शकतात.
मकर : मिळकतीत वाढ होवू शकते. प्रिय व्यक्तीच्या भेटीने सुसंवाद घडून येईल.
कुंभ : अचानक एखादी समस्या निर्माण होवू शकते. संयमाने परिस्थिती हाताळण्यात यशस्वी व्हाल.
मीन : महत्वाच्या प्रश्नांची उकल होण्यास मदत होईल. कामाचा योग्य मोबदला हाती येईल.