जळगावला सीए कडील घरफोडीत सहा लाखाचा ऐवज लंपास

On: January 28, 2023 8:06 AM

जळगाव : जळगाव शहरातील चार्टर्ड अकाऊंटंट राजेश कलंत्री यांच्या शाहू नगर  परिसरातील निवासस्थानी झालेल्या घरफोडीत 6 लाख 10 हजार रुपयांच्या मुद्देमालाचा ऐवज चोरी झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीए राजेश कलंत्री यांच्या शाहू नगरातील घरात दि. 26 जानेवारीच्या सकाळी आठ ते 27 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडलेला घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत 1 लाख 70 हजार रुपये रोख, 2 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 70 हजार रुपये किमतीचे चांदीचे भांडे व कॉईन आणि 1 लाख रुपये किमतीचा हिरामोती (डायमंड) आणि अंगठी अशा मुद्देमालाचा त्यात समावेश आहे. पुढील तपास हे.कॉ. शरीफ रहीम शेख करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment