मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी):- जळगाव येथील जेबी प्लास्टोकेमच्या कार्याला अधोरेखीत करून मॉडर्न प्लास्टिक इंडियातर्फे “मॉडर्न प्लास्टिक इंडिया अॅवॉर्ड 2023” फास्टेस्ट ग्रोविंग एमएसएमई पुरस्काराने मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट येथे गौरवान्वित करण्यात आले.
हा पुरस्कार जे.बी. प्लास्टोकेमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन व संचालक कैलास खैरनार यांनी मुंबई येथील श्रीलंका दुतावासाचे डॉ. वल्सन के वेथोडी यांच्याहस्ते स्वीकारला. या सोहळ्यास जगभरातील निवडक प्लास्टिक उदयोगातील उद्योजक, सरकारी अधिकारी, विविध कंपन्यांचे अधिकारी व प्रतिनिधी, संशोधक आणि निर्यातदार व आयातदार मान्यवर उपस्थित होते.मॉडर्न प्लास्टिक इंडिया हे एक अग्रणी मासिक आहे. त्यात जगभरातील प्लास्टिक विश्वातील घडामोडी प्रकाशीत होतात. गिनु जोसेफ हे मॉडर्न प्लास्टिकग्लोबल नेटवर्कचे सीईओ आणि मुख्य संपादक असून त्यांच्या संकल्पनेतून हे पुरस्कार दिले जातात.