इंडिया मीडिया लिंक्स अँड इव्हेंटस मॅनेजमेंट टीमच्या वतीने सालाबादप्रमाणे कडाक्याच्या थंडीत मुंबई शहरातील उघड्यावर राहणा-या गोरगरिबांना ब्लॅंकेटसह खाद्यपदार्थांचे वितरण करण्यात आले. 25 व 26 जानेवारीच्या मध्यरात्री टाटा कॅन्सर हॉस्पीटलच्या बाहेर तसेच के.ई.एम.हॉस्पीटल परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला.
कडाक्याच्या थंडीत मुंबई शहरातील फुटपाथवर उघड्यावर झोपलेल्या गरजू आणि गरिब लोकांच्या अंगावर त्यांना न उठवता त्यांच्या अंगावर मायेच्या उबेसह ब्लॅंकेट टाकण्यात आले. तत्पुर्वी झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी मीडिया प्रतिनिधी, अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. गोरगरिबांना छोटासा आधार देण्याचा हा एक यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
यावेळी इंडिया मीडिया लिंक्स अँड इव्हेंटस मॅनेजमेंटचे संचालक, समाज सेवक, वरिष्ठ पत्रकार के.रवी (दादा) यांना सहयोग करण्यासाठी त्यांच्या टीम मधील सदस्य, दिनेश सोलंकी, शरद रणपिसे, मीरा कौशिक, राम तांबे, झकेरिया शेख, रमजान, दीपक पडिये, डॉ.जावेद, अप्पा गायकवाड, विलास गडशी तसेच पोलिस इन्स्पेक्टर सुशील जाधव, भोजपुरी सिंगर रवी यादव, हिंदी फिल्म डायरेक्टर अझर हुसैन, रॅप सिंगर तथा ॲक्टर बेंजामिन, गिनिस बुक रेकॉर्ड विजेते अनिल कांबळे, फिल्म डायरेक्टर सागर झारापकर wow Bhai wow फेम, राष्ट्रीय खेळाडू मारिया पटेल, अनिल कांबळे, एमएसआरडीसीचे प्रसिध्द समाज सेवी अधिकारी अनिल कुमार गायकवाड, महानगरपालिका माजी उपायुक्त आनंद वाग्रालकर, प्रदूषण मंडळातील अधिकारी यशवंत सोनटक्के, महानगर पालिका अधीक्षक अरुण सावंत, महानगर पालिका अधिकारी जितेंद्र मढे, पत्रकार राजेंद्र साळसकर, युवा उद्योजक, आदर्श स्वराज्यचे संपादक उदय पवार, इंग्रजी दैनिक स्प्राऊट्स उपसंपादक राजेंद्र साळसकर, पत्रकार शेखर छत्रे, समाजसेवक महेंद्र सातपुते, दक्षिण मुंबई केटरींग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन कोलगे, मंगेश थोरात या सगळ्यांच्या मदतीसह शेकडो लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी झाला.