जळगाव : एमपीडीए कायद्याअंतर्गत चाळीसगावच्या निखील उर्फ भोला सुनिल अजबे (रा. नारायणवाडी, चाळीसगाव) यास एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत, गर्दीसह दुखापत, हद्दपार आदेशाचे उल्लंघन असे प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण पाच गुन्हे दाखल दाखल आहेत. प्रत्येक गुन्ह्यात त्याला वेळोवेळी अटक करण्यासह त्याचेवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली आहे.
तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा भारतीय दंड विधान व मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत सराईतपणे गुन्हे करत होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता तो स्वत: आणि त्याच्यासोबत असणा-या गुंडांसोबत घातक शस्त्रे सोबत ठेवून लोकांवर दहशत व भिती निर्माण करत होता. त्यास कायदयाचा अजिबात धाक राहिला नव्हता. परिणामी सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठया प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षीतेची भावना तयार झाली होती.
दिवसेदिवस वेगवेगळ्या तऱ्हेने गुन्हे करण्याची त्याची प्रवृत्ती बळावत होती. सर्वसामान्य लोकांच्या जिवीतास तो उपद्रवी झाला होता. त्यामुळे त्याच्या विरुध्द महाराष्ट्र झोपडपटटी दादा, हात भटटीवाले औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम सन 1981 नुसार ‘धोकादायक व्यक्ती’ या संज्ञेत तो मोडत असल्याने त्याच्या विरुध्द एमपीडीए नुसार कारवाई करणे आवश्यक होते. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी त्याच्या विरुध्द चौकशी पूर्ण करुन पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. पडताळणीअंती पोलीस अधिक्षकांनी तो प्रस्ताव जिल्हादंडाधिका-यांकडे पाठवला होता.
निखील ऊर्फ भोला सुनिल अजबे यास स्थानबध्दतेचे आदेश जारी करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, चाळीसगाव शहर पो स्टे प्रभारी अधिकारी के. के. पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, हे.कॉ. जयंत भानुदास चौधरी, पोकॉ. ईश्वर पंडीत पाटील व चाळीसगाव शहर पो.स्टेचे स.पो.नि. सागर ढिकले, पोना विनोद भोई, पोना अमित बाविस्कर, पोना भुषण पाटील, पोकॉ. विजय पाटील, अमोल भोसले, रविंद्र बच्छे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. निखील अजबे याची रवानगी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.