जळगाव दि.३१ प्रतिनिधी : – तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया चे निरीक्षक श्री राजकुमार कश्यप (उत्तर प्रदेश) व औरंगाबाद खंडपीठाचे वकील तथा निवडणूक अधिकारी विजय ढाकणे यांच्या निरिक्षणाखाली सन २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या कार्यकारी मंडळाची निवडणूक प्रक्रिया दि. २९ जानेवारी २०२३ रोजी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पार पडली.
त्यानुसार तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या अध्यक्षपदी डॉ. श्री अविनाश बारगजे (बीड), उपाध्यक्ष श्री. धुलीचंद मेश्राम (गोंदिया), श्री. विनायक गायकवाड (मुंबई उपनगर), महासचिव श्री. मिलिंद पठारे, सचिव श्री. सुभाष पाटील (रायगड), खजिनदार श्री. व्यंकटेश कररा (रत्नागिरी), श्री. निरज बोरसे (संभाजीनगर), श्री. अजित घारगे (जळगाव), श्री. सतिश खेमसकर (चंद्रपूर) यांची कार्यकारी समिती सदस्यपदी निवड झाली. सोबतच विविध समित्यांचे अंतर्गत श्री छत्रपती पुरस्कार विजेते श्री प्रविण बोरसे, सौ. वृषाली पाटील जोगदंड (नांदेड), श्री. राजेश महाजन (उस्मानाबाद),व श्री. भालचंद्र कुलकर्णी (सिंधुदुर्ग) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली तर श्री लेखा छेत्री (यवतमाळ), श्री. कौशिक गरवालीया (ठाणे), श्री. विनायक एणपुरे (सांगली) यांची निवड झाली आहे.
अजित घारगे यांच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री. अतुल जैन, उपाध्यक्ष श्री. ललीत पाटील, सहसचिव श्री रवींद्र धर्माधिकारी, खजिनदार श्री. सुरेश खैरनार, श्री. सौरभ चौबे, श्री. नरेंद्र महाजन, श्री. कृष्णकुमार तायडे, श्री. महेश घारगे, श्री. अरविंद देशपांडे यांनी कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.