चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

On: February 3, 2023 9:08 PM

जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशन मलकापुर यांना चोरीच्या गुन्ह्यात हव्या असलेल्या फरार आरोपीस जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध  पथकाने अटक केली आहे. गणेश ज्ञानदेव नेहेते (रा. खुबचंद नगर सुप्रिम कॉलनी जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मलकापूर एमआयडीसी पोलिस स्टेशनला भाग 5 गु.रं.न 95/2022 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

आरोपी गणेश ज्ञानदेव नेहते हा गुन्हा घडल्यापासून तसेच दाखल झाल्यापासून फरार होता. त्याला मलकापूरचे हे.कॉ. प्रल्हाद विश्वनाथ चोपडे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या तपासकामी पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनखाली पो.उप निरिक्षक आनंदसिंग पाटील, पोना किशोर पाटील, पोना योगेश बारी, पोकॉ मुकेश पाटील, पोकॉ किरण पाटील आदींनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment