पॅरोलवर बाहेर येताच चोरीचे सत्र

On: August 16, 2020 10:30 PM

मुंबई : पॅरोलवर आलेल्या सराईत गुन्हेगाराने पुन्हा चोरी केल्याचा प्रकार डोंगरी पोलिसांनी उघड केला आहे. मेहराज उर्फ पेंढारी मुर्तुजा खान (२४) असे पॅरोलवर सुटलेल्या व अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध भायखळा आणि वडाळा पोलीस स्टेशनला ७ गुन्हे दाखल आहेत.

शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास तक्रारदार वाड़ीबंदर पोलीस लाईन येथे येताच, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पसार होण्यात यश मिळवले. रात्रपाळीच्या ड्युटीवर असलेले सपोनि घोरपडे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळावरील तांत्रिक पुराव्याच्या मदतीने अवघ्या तीन तासाच्या आत मेहराज खान यास घोडपदेव परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने त्याचा मित्र वसीम याच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे कबुल केले. गुन्हयात वापरलेली मोटरसायकल व चोरी केलेला मोबाईल दोघांकडून हस्तगत करण्यात आला.

यातील आरोपी मेहराज खान हा गॅस सिलेंडर डिलिव्हरीचे काम करतो. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, चोरी, यासह विविध कलमान्वये ७ गुन्हे दाखल आहेत. पॅरोलवर बाहेर येताच त्याने हा गुन्हा केल्याचे कबुल केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment