पुडुचेरी तायक्वांडो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ प्रशिक्षक म्हणून जयेश बाविस्कर यांची निवड

On: February 7, 2023 10:38 PM

जळगाव दि.७ प्रतिनिधी –  पुडुचेरी येथील श्री राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, इंदिरा गांधी स्पोर्टस् काॅम्पलेक्स येथे ३८ व्या राष्ट्रीय वरीष्ठ पुरुष व महिला तायक्वांडो क्युरोगी स्पर्धेचे दि. १० ते १२ फेब्रुवारी २०२३  दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत आठ पुरुष व आठ महिला महाराष्ट्र राज्याचे नेतृत्त्व करणार आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीचे (एन.आय.एस) प्रशिक्षक जयेश बाविस्कर यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षक म्हणून निवड झाली. त्याच्या या निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे, जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक  केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment