भुसावळ शहरात 500 किलो गांजा जप्त

जळगाव : रात्र गस्तीदरम्यान भुसावळ शहरातून जाणा-या महामार्गालगत विनाचालक संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या आयशर वाहनातून सुमारे 500 किलो 660 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या घटनेत दोघांना देखील अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि.9 फेब्रुवारी रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार अनिल जगन्नाथ जाधव, पोहेकॉ कमलाकर भालचंद्र बागुल, पोहेकॉ अनिल गणपतराव देशमुख, पोना श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, चापोकॉ प्रमोद शिवाजी ठाकुर असे रात्रगस्तकामी कार्यारत होते. दरम्यान 10 फेब्रुवारीच्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील जॉली पेट्रोलपंपाच्या समोर महामार्गानजीक उड्डाणपुलाखाली एक संशयास्पद आयशर वाहन पथकाच्या नजरेस पडले. बराच वेळ झाला तरी देखील या वाहनावरील चालक त्याठिकाणी आला नाही. त्यामुळे हे वाहन मॅकेनिकच्या मदतीने भुसावळ तालुका पोलिस स्टेशन आवारात आणले गेले.

या वाहनाच्या तपासणीअंती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ वासुदेव राजधर मराठे, पोना रणजित अशोक जाधव यांना या वाहनात गांजा आढळून आला. या वाहनात गांजा या अंमली पदार्थाच्या सोळा गोण्या आढळून आल्या. या गांजाचे वजन 500 किलो 660 ग्रॅम वजन असल्याचे आढळून आले आहे. या गांजाची किंमत सुमारे 75 लाख 9 हजार 900 रुपये आहे. भुसावळ शहर पो.स्टे.ला भाग 5 गु.र.नं. 21/2023 NDPS क. 8 (क), 20 (ख),21, 25, 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनात मिळून आलेल्या कागदपत्रांच्या आधारे तपास पथकाने दोघांना अटक केली आहे.

सदर वाहनात मिळून आलेल्या कागदपत्रांच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील पथक आरोपीतांचे शोध कामी धुळे, मालेगाव, नाशिक अशा ठिकाणी रवाना झाले होते. सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयांतील २ आरोपीतांना शिताफिने ताब्यात घेतले असून त्यांना वरील गुन्हयांत अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील, भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, पोउनि गणेश चौबे, सहायक फौजदार अनिल जगन्नाथ जाधव, पोहेकॉ सुनिल दामोदरे, वासुदेव मराठे, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, दिपक पाटील, अक्रम शेख याकुब, पोना रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, पोकॉ सचिन महाजन, ईश्वर पाटील, चापोकॉ मुरलीधर बारी, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी, भुसावळ शहर पो.स्टे.चे सहायक फौजदार मोहमद अली सैय्यद, पोहेकॉ संजय पाटील, पोना सोपान पाटील, पोकॉ मोहन पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. पोलिस उप निरीक्षक गणेश चौबे पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here