केंद्राच्या सूचनेनंतरच शाळांचा निर्णय घेणार – शिक्षणमंत्री गायकवाड

On: August 17, 2020 11:16 AM

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणीक वर्षा वाया जाणार नाही यासाठी पुरेपुर प्रयत्न सुरु असल्याचे देखील मंत्री गायकवाड यांनी म्हटले आहे.

१५ जून रोजी अमेरिकेत शाळा सुरु झाल्या. शाळा सुरु झाल्यानंतर तेथे मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली. त्यामुळे केंद्र सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत शाळा सुरु न करण्याबाबत निर्णय घेतला. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्याशिवाय राज्यात शाळा सुरु होणार नसल्याचे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment