दुचाकी वाहनांसाठी आवडीचा क्रमांक मालिका

On: August 17, 2020 4:07 PM

जळगाव : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच-19-डीक्यु-0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा क्रमांक हवा असेल, त्यांनी दि. 17 व 18 ऑगस्ट या दोन दिवसांपर्यंत दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज करावेत. असे आवाहन श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
या अर्जासोबत शासकीय शुल्काचा डीडी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे द्यावा. शुल्क भरल्यावर 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क हस्तांतरीत होणार नाही. नवीन मालिका दि. 20 ऑगस्टपासून नियमित सुरु करण्यात येईल. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन श्री. लोही यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment