पो.नि. अनिल कटके येणार जळगावला

जळगाव : अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांची जळगावला बदली झाली असून शिवजयंती बंदोबस्त आटोपल्यानंतर ते जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहेत. पो.नि. अनिल कटके यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

अनिल कटके, दौलतराव जाधव, बाजीराव पोवार, सुनील पाटील अशी बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी चौघांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. शिवजयंती बंदोबस्त आटोपल्यानंतर तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देखील त्यांना देण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची नाशिक ग्रामीण, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांची धुळे तर सुनील पाटील यांची नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली असून चौघे अधिकारी लवकरच नव्या नियुक्तीसाठी बदलीच्या जिल्ह्यात जाणार आहेत. सध्या अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचा कारभार पाहणारे पो.नि. अनिल कटके यांनी अनेक किचकट गुन्हे उघडकीस आणले आहेत. जळगाव जिल्ह्यात त्यांची नियुक्ती कुठे होते? याबाबत उत्सुकता लागली आहे.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here