2 लाख 65 हजाराची रोकड हिसकावत चौघांचे पलायन

On: February 17, 2023 10:18 AM

जळगाव : चाळीसगाव येथील मेडीकल दुकानदाराच्या ताब्यातील 2 लाख 65 हजार रुपये असलेली बॅग हिसकावत चौघा अज्ञात तरुणांनी पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. 15 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच स्वरुपाच्या लुटीची घटना जळगाव शहरातील पांडे चौकात घडली होती. जळगावच्या घटनेतील दुकानदाराला लुटणा-या तरुणांना त्यांच्या दुकानात काम करणा-या कर्मचा-याने टीप दिली होती. दोन्ही घटनेतील गुन्ह्याची वेळ रात्री दुकान बंद करुन जातांनाची आहे. दिवसभरातील कॅश काऊंटरची रक्कम घरी घेवून जात असल्याची पाळत ठेवली जात असल्याचे या घटनेतून म्हटले जात आहे.

संजय हसमतराय मंदाणी यांचे चाळीसगाव शहरात मेडीकल दुकान आहे. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ते शांतीनगर परिसरात आपल्या घरी जात होते. वाटेत गुरुमुख तलरेजा यांच्या घराजवळ त्यांची चौघा 25 ते 35 वयोगटातील अज्ञात तरुणांनी वाट अडवली. त्यांच्या अ‍ॅक्टीव्हा वाहनावर पायदानावर ठेवलेली बॅग चौघांनी नियोजनबद्धरित्या हिसकावून नेली. पुढील तपास सुरु आहे.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment