जळगाव : मांडूळ सापाची तस्करी करणा-या चौघांना मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिका-यांच्या पथकाने अटक केली आहे. अटकेतील चौघांविरुद्ध वनविभागतर्फे वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. विजयसींग मोरसींग राठोड, योगेश फुलसींग राठोड, शांताराम बळीराम राठोड, रुपेश मदन राठोड (सर्व रा. मोरझीरा ता. मुक्ताईनगर जिल्हा जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
वनपरिक्षेत्र मुक्ताईनगर व गस्तीपथक स्टाफ जळगाव यांच्या संयुक्त पथकाने या कारवाईत 18 फेब्रुवारी रोजी सहभाग घेतला. मुक्ताईनगर येथील बुरहानपुर रस्त्यावरील रामभाऊ पेट्रोल पंपासमोर मांडूळ सापाची चौघे जण तस्करी करत असल्याची माहिती वनविभागाला समजली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. अटकेतील चोघांविरुद्ध वन्यजीव सरंक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 48 (A), 49, 50, 51 नुसार करण्यात आलेल्या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी कु. कृपाली रामदास शिंदे, वनक्षेत्र मुक्ताईनगर, यांनी मुद्देमाल जप्त केला.
उवनसरंक्षक जळगाव वि.वि. होशिंग, सहाय्यक वनसरंक्षक (मृद व कॅम्प ) यु. एम. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई, श्रीमती दिपश्री जाधव वनपाल, वाय. जी. दिक्षीत वनपाल, तुळशीराम घरझाळे, वनरक्षक, नितीन खंडारे वनरक्षक, उल्हास पाटील वनरक्षक, संचलाल पवार शंकर कोळी, रायसींग पारधी, नरेंद्र बारी, जितेंद्र धांडे, वाहनचालक नबाब पिंजारी, योगेश जाधव डाटाएन्ट्री ऑपरेटर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.