स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मधून पैसे काढण्याच्या नियमात आता बदल करण्यात आला आहे. मोफत ट्रान्झेक्शनची मर्यादा संपल्यानंतर पुन्हा रक्कम काढल्यास त्यावर थेट दंड आकारला जाणार आहे. खात्यामध्ये शिल्लक रक्क्म नसली अथवा ट्रान्झेक्शन फेल झाले तरी देखील ग्राहकांच्या माथी दंड आकारला जाईल.
स्टेट बँक मेट्रो शहरांमध्ये एका एटीएम कार्डाद्वारे दरमहा आठ वेळा निशुल्क पैसे काढण्याची मुभा देते. याचा सरळ अर्थ असा की तुम्ही मेट्रो शहरातील रहिवासी असाल तर तुम्हाला विनाशुल्क आठ वेळा पैसे काढता येतील. त्यानंतर पुढील प्रत्येक ट्रान्झेक्शनवर तुमच्याकडून शुल्काची आकारणी ठरलेली आहे. स्टेट बॅकेच्या एटीएम मधून फ्री पैसे काढण्याच्या नियमानुसार पाच वेळा आणी अन्य बॅंकांच्या एटीएम मधून तिन वेळा पैसे काढता येतात. मेट्रो शहरात मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरु आणि हैदराबाद यांचा सहभाग आहे.
गैर मेट्रो शहरांमध्ये स्टेट बॅंकेचे खातेधारक 10 वेळा एटीएममधून विनाशुल्क पैसे काढू शकतात. यामध्ये 5 वेळा एसबीआयच्या तर पाच वेळा इतर बॅंकांच्या एटीएम मधून पैसे काढता येणार आहेत. ही मर्यादा संपल्यानंतर ग्राहकांकडून दहा ते वीस रुपये शुल्क वसुल करु शकते.
एसबीआयच्या दुसऱ्या नियमानुसार खात्यात पैसे शिल्लक नसतांना प्रत्येक फेल ट्रान्झेक्शनला 20 रुपये दंड आणि जीएसटी शुल्क आकारले जाणार आहे. त्यासाठी अगोदर बॅलन्सची पुरेपुर माहिती घेवूनच पैसे काढावे लागणार आहेत.
एसबीआयच्या तिस-या नियमानुसार खातेधारकाला एटीएममधून 10000 पेक्षा जास्त रक्कम विड्रॉल करायची असल्यास मोबाईलवर ओटीपी पाठविला जाणार आहे. तो ओटीपी पुन्हा एटीएममध्ये टाकून पैसे विड्रॉल करता येणार आहेत. ही ओटीपीची सुविधा केवळ रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंतच सुरु राहणार आहे. जर ग्राहक दुसऱ्या बँकेच्या एटीएमधून पैसे विड्रॉल करत असेल तर ओटीपी पाठविला जाणार नाही.