न्यायालयातून पळून जाणा-यासह न्यायालयात दहशत निर्माण करणा-या आरोपींना अटक

On: February 21, 2023 7:26 PM

जळगाव : न्यायालयातून पळून जाणा-या आणि घातक शस्त्र बाळगून न्यायालयात दहशत निर्माण करणा-या अशा दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अरुण भगवान गवळी असे न्यायालयातून पळून जाणा-या आरोपीचे नाव आहे. तसेच दर्शन उर्फ चंद्रकांत शर्मा असे घातक शस्त्र बाळगत न्यायालयात दहशत निर्माण करणा-या आरोपीचे नाव आहे.  

जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल गु.र.नं. 40/2023 भा.द.वि. 224 या गुन्ह्यात अरुण भगवान गवळी (रा.गुम्मी ता. जि. बुलढाणा) हा आरोपी आहे. तो न्यायालयातून पळून गेला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील हे.कॉ. महेश महाजन, पोना नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, चालक हे.कॉ. भरत पाटील आदींच्या पथकाने त्याला शिताफीने अटक  केली आहे. पुढील तपासकामी त्याला जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दुस-या घटनेत जिल्हा न्यायालयात सुरु असलेला खून खटल्यातील मुख्य साक्षीदारास धमकावण्याकामी दर्शन उर्फ चंद्रकांत शर्मा हा त्याच्या कब्जात घातक हत्यार बाळगून असल्याची गोपनीय माहिती पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील हे.कॉ. राजेश मेंढे, संजय हिवरकर, संतोष मायकल, प्रितम पाटील, विजय पाटील आदींनी त्याला चाकूसह जिल्हा न्यायालयाच्या परिसरातून अटक केली. त्याला पुढील तपासकामी जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment