घातक शस्त्र बाळगणा-स अटक

On: February 26, 2023 11:09 PM

जळगाव : घातक शस्त्र बाळगणा-यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे. भिकन रमेश कोळी (रा. उत्राण ता.एरंडोल जिल्हा जळगाव) असे तलवारीसह अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

भिकन रमेश कोळी  हा अवैधरित्या तलवार घेवून एरंडोल तालुक्यातील उत्राण या गावी तलवारीच्या बळावर दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, हे.कॉ. लक्ष्मण पाटील, संदिप सावळे, पोना नंदलाल पाटील, भगवान पाटील, पोकॉ. इश्वर पाटील, मोतीलाल चौधरी आदींना तपासकामी रवाना केले होते. तपास पथकाने उत्राण या गावातील जी.के.फिटनेस क्लब येथून त्याला विनापरवाना बेकायदा तलवारीसह ताब्यात घेत अटक केली. पुढील कारवाईकामी त्याला कासोदा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment