जळगाव : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा-या फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मुकुंद बापू मोरे असे गुन्हा दाखल झाल्यापासून दोन वर्षापासून फरार आरोपीचे नाव आहे. एरंडोल न्यायालयाकडून त्याच्याविरुद्ध पकड वारंट काढण्यात आले होते.
भारतीय रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी मुंकुद बापु मोरे (रा. चाळीसगाव) याच्याविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. फसवणूक झालेल्या संबंधीतांकडून त्याच्याकडे पैंशाचा तगादा सुरु होता. दरम्यानच्या कालावधीत मुकुंद मोरे याने त्यांना दिलेला चेक देखील बाऊंन्स झाला होता. मुकुंद मोरे याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध पकड वारंट काढले होते.
फरार मुकुंद मोरे हा नाशिक परिसरात आपली ओळख लपवून फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील सहायक फौजदार अनिल जाधव, हे.कॉ. संदिप पाटील, पोना नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, चालक हे.कॉ. भरत पाटील आदींना त्याच्या शोधार्थ रवाना केले होते. पथकाने नाशिक बस स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेत एरंडोल न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगीचे आदेश दिले आहेत.