आजचे राशी भविष्य (13/3/2023)
मेष : व्यापारात योग्य वेळी घेतलेले निर्णय सकारात्मक ठरतील. संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता.
वृषभ : हितशत्रूंच्या कारावायांपासून सतर्क राहिलेले योग्य राहील. अनोळखी व्यक्तींपासून जपून रहावे.
मिथुन : गुंतवणूक करतांना खबरदारी आवश्यक. विद्यार्थी वर्गाने परिश्रम घेणे गरजेचे आहे.
कर्क : वरिष्ठांसोबत जुळवून घेण्याचे धोरण ठेवावे. रागावर ताबा ठेवून कामावर लक्ष केंद्रीत करणे योग्य.
सिंह : अचानक धनलाभाचे योग जुळून येण्याची शक्यता. नोकरदारांना चांगला दिवस.
कन्या : कोणत्याही गोष्टीत स्वत:हून फसगत करु नका. मित्रांचे सहकार्य, ओळखीतून लाभाची शक्यता.
तुळ : जुनी येणी वसूल होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना नविन संधी प्राप्त होण्याची शक्यता.
वृश्चिक : अति घाईने निर्णय घेणे टाळावे. आर्थिक स्थिती सुदृढ करण्यासाठी योजना आखाल.
धनु : व्यवसायात प्रगती होईल. कौटूंबिक सुखसमाधान लाभेल व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होईल.
मकर : सामाजीक व्याप्ती वाढेल. बेरोजगारांना चांगली बातमी समजेल.
कुंभ : रखडलेल्या कामांना नव्याने सुरुवात होण्याची शक्यता. संमिश्र घटनांचा दिवस.
मीन : आहाराचे पथ्य नियमीत पाळा. चुका झाल्यास निःसंकोच मान्य करणे उचीत ठरेल.