जळगाव दि. 27 (प्रतिनिधी) – अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘अनुभूती इनोव्हेशन’ सेंटर असून विद्यार्थांच्या कल्पकतेला वाव देत संशोधात्मक वृत्ती यातून जोपासली जाते. वर्षभर विद्यार्थी मेकॅनिकल अँडव्हांटेज, मॅग्रेटीक लिफ्टचे उपकरण, व्हाइस कंट्रोल ऑन ऑफ सिस्टम यासह विज्ञानावर आधारित विविध मॉडेल, प्रोजेक्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साकारतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, भौतिकशास्त्रातील प्राथमिक बाबी समजाव्या जेणे करून विद्यार्थी अत्याधुनिक विज्ञानावर आधारित उपकरणे, मॉडेल, प्रोजेक्ट तयार करतात, यासाठी अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘विज्ञान दिनी’ दि. २८ फेब्रुवारी ला विज्ञानासंबंधीत विविध विषयानुसार प्रोजेक्ट प्रदर्शनी व सादरीकरण विद्यार्थ्यांकडून होईल.
१ मार्च पर्यंत हे प्रदर्शन असेल. विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, डॉ. आर. स्वामीनाथन यांच्याहस्ते होईल.विज्ञान या ज्ञानशाखेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयाला धरून संशोधनात्मकदृष्टीने सादरीकरण केले जाईल. सोबतच माहिती तंत्रज्ञान, गणित, इंजिनेअरिंग, कॉम्प्युटर, रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित साधारणत: ३७ प्रोजेक्टचे अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण केले जाईल. सादरीकरणामधील विशिष्ट विषयांवर प्रश्नोत्तर स्पर्धा घेतली जाईल. यानंतर तज्ज्ञ परिक्षकांकडून प्रोजेक्ट सादरीकरणातील विजेते निवडले जातील.
विजेत्या स्पर्धेकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. या विज्ञान प्रदर्शनीसाठी निमंत्रीत काही शाळांमधील विद्यार्थ्यांनासुद्धा आपले प्रोजेक्ट सादरीकरणाची संधी असेल.संशोधनाला चालना देण्यासाठी प्रदर्शन सर्वांसाठी खुलेविद्यार्थ्यांमधील नवनवीन कल्पनांना संशोधकदृष्टीने चालना मिळावी, यासाठी अनुभूती निवासी स्कूलमधील प्रोजेक्ट हे इतर स्कूल मधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी पाहता येणार आहे. इयत्ता ४ ते ९ मधील विद्यार्थी व त्यांचे पालकांना हे प्रदर्शन दि. १ मार्च ला दुपारी ३ ते ६ या वेळेत अनुभूती निवासी स्कूल येथे पाहता येणार आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा आपल्या पाल्यांमधील संशोधकवृत्तीला हेरून, वैज्ञानिकदृष्टीने त्याला आधार देण्यासाठी जास्तीतजास्त पालकांनीसुद्धा प्रदर्शनीला भेट द्यावी, असे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी केले आहे.