एमपीडीए कायद्याखाली समीर काकर स्थानबद्ध

On: March 1, 2023 3:56 PM

जळगाव : एमपीडीए कायद्याखाली जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील समीर हनीफ काकर या तरुणास स्थानबद्ध करण्यात आले आहे. समीर काकर याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न या कलमाखाली एक, गंभीर दुखापत करणे या कलमाखाली एक, गर्दीसह दुखापत या कलमाखाली एक, सरकारी नोकरावर हल्ला या कलमाखाली एक आणि घरफोडीचे पाच असे एकुण अकरा गुन्हे दाखल आहेत.

जळगाव शहर, रामानंद नगर आणि एमआयडीसी पोलिस स्टेशन अशा तिन पोलिस स्टेशनला मिळून त्याच्याविरुद्ध एकुण अकरा गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे व पो.नि. शंकर शेळके यांच्यासह सहायक फौजदार युनुस शेख, हे.कॉ. सुनिल  दामोदरे, जयंत चौधरी, इश्वर पाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. नितीन पाटील, सचिन पाटील, इमरान सैय्यद, इमरान बेग आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील समीर काकर याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment