जळगाव जिल्हयातून दोघे हद्दपार

On: March 3, 2023 6:58 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून दोघा गुन्हेगारांना हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. संदिप भास्कर ढोके आणि विशाल वाल्मिक जाधव (दोघे रा.गेंदालाल मिल,जळगाव) अशी हद्दपारीची कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

या दोघांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी योग्य ती कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या वर्तनात बदल झाला नसल्याचे दिसून आले आहे. दोन वर्षासाठी दोघांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment