फेसबुकच्या महिला अधिकाऱ्यास धमकी

अंखी दास

दिल्ली : फेसबुकच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकारी अंखी दास यांनी दिल्ली पोलिसात त्यांना मिळालेल्या धमकी प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अंखी दास यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात येत होती. फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी संचालक अंखी दास यांच्या तक्रारीनुसार सायबर सेल युनिट काम करत आहे.

अंखी दास यांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्यांनी असा आरोप केला आहे की, काही लोक ऑनलाइन पोस्ट करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत ​​आहेत. त्यांच्याबद्दल अश्लील कमेंट देखील करत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार 14 ऑगस्ट रोजी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखासंदर्भात त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. लेख प्रसिद्ध झाल्यापासून आपल्याला सतत या धमक्या मिळत असल्याचे अंखी दास यांनी आपल्या  तक्रारीत नमुद केले आहे.

आपल्या तक्रारीत अंखी दास यांनी पुढे म्हटले आहे की, ऑनलाईन कंटेंटद्वारे आपल्यासह कुटुंबीयांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे. कंटेंटमध्ये एका वृत्तपत्रातील लेखाच्या आधारे आपली प्रतिष्ठा खराब करण्याचा हा  प्रयत्न सुरु असल्याचा त्यांनी दावा केला आहे. वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्रात फेसबुकवर प्रसिद्ध झालेल्या या लेखामुळे काँग्रेस व भाजपात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here