कडीकोंडा तोडून रोख रकमेसह दागिने लंपास

On: March 4, 2023 7:54 PM

जळगाव : जळगाव शहरातील हनुमान नगरात बंद घराचे कुलुप तोडून रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमान नगर परिसरातील विशाल गोपाळ पाटील यांच्याकडे हा प्रकार घडला आहे.

1 मार्च रोजी विशाल पाटील हे आपल्या परिवारासह धरणगाव तालुक्यात नातेवाईकांच्या लग्नात गेले होते. दरम्यान 3 व 4 मार्च दरम्यान रात्रीच्या वेळी त्यांच्या कुलुपबंद घराचा कडीकोंडा तोडून बेडरुम मधील कपाटातून चोरी केल्याचे उघड झाले. या घटनेत 9 हजार रुपये रोख, 70 हजार रुपये किमतीच्या 20 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, 17 हजार रुपये किमतीचे इतर दागिने असा एकुण 96 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यत आला आहे.  पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment