चोरीच्या सहा बक-यांसह दोघा महिलांना अटक

जळगाव : चोरीच्या सहा बक-यांसह त्या चोरणा-या शिरसोली येथील दोघा महिलांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. चोरी करणा-या दोघा महिलांनी चोरीचा गुन्हा बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथे केला होता. चोरी केलेल्या बक-या जळगाव येथे गुरांच्या बाजारात विक्रीसाठी आणल्या असतांनाच दोघी महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या. उषा पांडुरंग काटे आणि सपना रविंद्र गोंधळी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा महिलांची नावे आहेत.  

4 मार्च रोजी सकाळी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे हे.कॉ. अल्ताफ पठाण आणि पो.कॉ. विशाल कोळी हे दोघे अ‍ॅंटी चेन स्नॅचिंग ड्युटीकामी हजर होते. दरम्यान दोन महिला चोरीच्या सहा बक-या विक्री करण्यासाठी गुरांच्या बाजारात आल्या असल्याची गोपनीय माहिती हे.कॉ. अल्ताफ पठाण यांना समजली.  मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघांनी बाजारात जावून खात्री केली असता दोघा महिलांच्या संशायास्पद हालचाली हे.कॉ. अल्ताफ पठाण यांच्या पारखी नजरेने हेरल्या.

याबाबतची माहिती हे.कॉ. अल्ताफ पठाण यांनी पो.नि. जयपाल हिरे यांना कळवली.  पो.नि. जयपाल हिरे यांनी आपल्या पथकाला हे.कॉ. अल्ताफ पठाण आणी पो.कॉ. विशाल कोळी यांच्या मदतीला रवाना केले. उषा पांडुरंग काटे आणि सपना रविंद्र गोंधळी या शिरसोली येथील दोघा महिलांची सखोल चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. दोघा महिलांच्या ताब्यातील बक-या चोरीचा गुन्हा बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी पोलिस स्टेशनला दाखल असल्याची माहिती पोलिस पथकाला समजली.

बोराखेडी पोलिस स्टेशनशी संपर्क साधत त्यांच्या ताब्यात दोघा महिलांना देण्यात आले. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. अल्ताफ पठाण, दत्तात्रय बडगुजर, विशाल कोळी, राहुल रगडे, सचिन पाटील, म.पो.कॉ. राजश्री बाविस्कर, मंगला तायडे, आशा सोनवणे, महिला होमगार्ड ललीता फिरके, इंगळे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here