अल्पवयीन मुलीचा पाठलाग, चाळे आणि अश्लिल चॅटींग – अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा

On: March 8, 2023 11:09 AM

जळगाव : अल्पवयीन मुलीचा वेळोवेळी पाठलाग करुन तिच्या शरिरासोबत छेडखानी करणा-या अल्पवयीन मुलाविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीची छेडखानी करण्याचे हे प्रकरण सुमारे एक महिन्यापासून सुरु होते. या एक महिन्याच्या कालावधीत त्या मुलाने सातत्याने तिचा पाठलाग सुरु ठेवला. त्याने तिच्या अवयवांना स्पर्श करुन तिची छेडखानी केली. हे प्रकरण एवढ्यावरच त्याने थांबवले नाही तर रात्री अपरात्री त्याने तिच्यासोबत अश्लिल चॅटींग देखील सुरु ठेवले.

या प्रकाराला वैतागून मुलीने हा प्रकार तिच्या पालकांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर तिच्या वडीलांनी शनीपेठ पोलिस स्टेशन गाठत त्या मुलाविरुद्ध भा.द.वि. 354, 506, बालकांचे लैंगीक अपराधापासून सरंक्षण कायदा 2012 कलम 7, 11(4) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस उप निरीक्षक प्रिया दातीर करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment