जळगाव : एमपीडीए कायद्या अंतर्गत भुसावळ येथील रहिवासी असलेला जितेंद्र उर्फ मोनू रामदास कोल्हे (अमरनाथ नगर भुसावळ) यास स्थानबद्ध करण्यात आले आहे. जितेंद्र कोल्हे याच्याविरुद्ध दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक, दरोड्याची तयारी केल्याप्रकरणी एक, गंभीर दुखापतीचे दोन, विनयभंगाचा एक आणि घरफोडीचे दोन असे एकुण सात गुन्हे दाखल आहेत.
हे सर्व गुन्हे भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दाखल आहेत. याशिवाय अदखपलपात्र पाच गुन्हे दाखल आहेत. जितेंद्र रामदास कोल्हे याची मध्यवर्ती कारागृह येरवडा जिल्हा पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे.