जळगाव : जळगाव शहरातील आर. आर. विद्यालय परिसरात असलेल्या एका बड्या दवाखान्यातील सुपरवायजरने महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव येथील जिल्हापेठ हद्दीतील एका सुप्रसिद्ध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधे 31 वर्षाची विवाहीत महिला सुरक्षा रक्षकाचे काम करते. या महिलेला या दवाखान्यातील सुपरवायजरने थंब मशिनला थंब करु दिले नाही. वेळोवेळी त्याने या विवाहीतेकडून अनैतीक संबंध ठेवण्याची मागणी केली. तु माझ्याशी संबंध ठेव नाहीतर मी तुला कामावर ठेवणार नाही असे बोलून तिच्या मनाला लज्जा निर्माण होणारे वक्तव्य केले.
या घटनेप्रकरणी विवाहीतेने जिल्हापेठ पोलिस स्टेशनला धाव घेत संबंधीत सुपरवायजर विरुद्ध आपली फिर्याद दाखल केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक अलका शिंदे करत आहेत.