फरार मोटार सायकल चोरटा अटक

On: March 11, 2023 6:17 PM

जळगाव : अमळनेर येथील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केला आहे. भुषण उर्फ जिगर रमेश बोंडारे (रा. उमाळा ता.जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल गु.र.न. 379/22 भा.द.वि. 379 नुसार 25 जुलै 2022 रोजी दाखल मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून या गुन्ह्यातील निष्पन्न झालेला आरोपी भुषण बोंडारे हा फरार होता. अमळनेर पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते.

दरम्यान भुषण बोंडारे हा जळगाव शहरात असल्याची गोपनीय माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी पोलिस उप निरीक्षक  आनंदसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, पोकॉ. छगन तायडे, किरण पाटील आदींना त्याच्या मागावर रवाना  केले होते. या पथकाने त्याला शिताफीने अटक केली असून अमळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अटकेतील भुषण बोंडारे याच्या विरुद्ध चोरी, घरफोडी, जबरी चोरी तसेच आर्म अॅक्टचे एकुण 36 गुन्हे दाखल आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment