जळगाव दि. ११ प्रतिनिधी – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा आर्ट मेला हे प्रदर्शन त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवते. ग्रामीण संस्कृती, शहरीकरण, महिलांचे संरक्षण यासह पर्यावरण हेच सर्व काही असे संदेश या प्रदर्शनातून मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशिलतेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन महत्त्वाचे असते ते अनुभूती निवासी स्कूल च्या व्यवस्थापनाकडून मिळत असते त्यातून अशा कलाकृतींची निर्मिती होते असे मनोगत प्रसिद्ध आर्टिस्ट नितीन सोनवणे यांनी व्यक्त केले.
अनुभूती निवासी स्कूल चे विद्यार्थ्यांकडून वर्षभरात कलेचे विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते. यातून चित्रकला, शिल्पकला, विणकाम, पॉटरी (मातीकाम), ब्लॉक प्रिंटिंग, पेपर क्राफ्ट या कलांचा अभ्यास करून त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असलेला ‘आर्ट मेला’ चे भाऊंचे उद्यानातील वसंत वानखेडे आर्ट गॅलरी येथे दि. ११ ते १२ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन प्रसिद्ध आर्टिस्ट नितीन सोनवणे, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन, जैन इरिगेशन चे अभंग जैन, प्राचार्य देबासिस दास, विजय जैन, कला शिक्षक प्रितम दास, प्रितोम खारा यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते फित सोडून उद्घाटन करण्यात आले.
आर्ट मेला मधील चित्र, शिल्प, पेटिंग हे एखाद्या व्यवसायीक कलावंताच्या तोडीचे आहे. त्यातील प्रबोधनात्मक संदेश हे विचार प्रवर्तक आहे,अभ्यास करणारा चित्रकार म्हणून मनाला आगळी अनुभूती झाल्यासारखे वाटते असे विजय जैन म्हणाले. अनुभूती निवासी शाळेतील इ. ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृतींचे त्यात ब्लॉक प्रिंटिंग, पेपर क्राफ्ट, पेंटीग, पॉट, विणकाम व बाटीककाम यांचे प्रदर्शन बघता येणार आहे. पेन्सील कलर,ॲक्रलिक,सॕरमिक्स नॕकेट राखू,वाॕटर कलर यासह विविध कलाकृती आर्ट मेला मध्ये पाहता येत आहे. आज प्रदर्शन स्थळी अनुभूती च्या विद्यार्थ्यांनी लाईव्ह शिल्प बनविले ते सर्वांसाठी आकर्षक ठरले.
भाऊंच्या उद्यानाच्या वेळेत म्हणजे सकाळी ५.३० ते १०.३० व संध्याकाळी ५ ते ९ वाजेदरम्यान पाहता येईल. हा ‘आर्ट मेला’ सर्वांसाठी खुला असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी स्कूलतर्फे आगळेवेगळे उपक्रम घेतले जातात. जळगावकरांनी आर्ट मेला अनुभवावा असे आवाहन अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी मनोगत व्यक्त करताना केले.