जळगाव : जळगाव शहरातील एका प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टरच्या दवाखान्यात असलेल्या मेडीकल स्टोअरमधे कामाला असलेली तरुणी बेपत्ता झाली आहे. तिच्या बेपत्ता झाल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील स्टेडीयम परिसरात असलेल्या एका प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टरचा दवाखाना आहे. या दवाखान्यातच असलेल्या मेडीकल स्टोअरमधे कामाला असलेल्या तरुणीला तिच्या आईने 11 मार्च रोजी सकाळी दहा वाजता दवाखान्यात सोडले. त्यानंतर त्या तरुणीने दुपारी पोटात दुखत असल्याचे कारण सांगून दवाखान्यातील मेडीकल स्टोअर मधून प्रस्थान केले. जातांना आपली पर्स आणि सामान मेडीकल स्टोअर मधेच सोडून गेलेल्या तरुणीची आई तिला घेण्यासाठी सायंकाळी तिला घेण्यासाठी आली.
मात्र तुमची मुलगी दुपारीच पोट दुखत असल्याचे कारण सांगून बाहेर गेली असल्याचे तिच्या आईला इतर कर्मचा-यांनी सांगितले. तरुणीला दररोज सकाळी दुकानावर स्वत: सोडण्यास आणी दररोज सायंकाळी स्वत: घ्यायला जाणारी तिची आई येण्यापुर्वीच दुपारी एकटी निघून गेलेल्या तरुणीचा पालकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र ती कुठेही मिळून आली नाही. अखेर तिच्या वडीलांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशन गाठत आपली मुलगी बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल केली. याप्रकरणी हे.कॉ. फिरोज रज्जाक पुढील तपास करत आहेत.