एटीएम मशिन फोडणारा एक संशयीत ताब्यात

On: March 14, 2023 8:13 AM

जळगाव : जळगाव शहरानजीक असलेल्या कानळदा गावातील स्टेट बॅँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न सोमवारच्या सकाळी उघडकीस आला. या घटनेत पोलीसांनी एका संशयीताला ताब्यात घेतले आहे. ताब्यातील संशयीताची कसून चौकशी सुरु असून या घटने प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.

कानळदा या गावात स्टेट बॅँकेचे एटीएम मशीन कार्यरत असून रविवारच्या मध्यरात्री पैसे काढण्याच्या बहाण्याने एकाने मशीनच्या कॅबीनमधे प्रवेश केला. मशीनचा ड्यूटी डोअर तोडून सीसीटीव्ही आणि सेन्सर वायरी कापण्यात आल्या. एटीएममधील पैसे चोरण्याचा देखील प्रयत्न झाला. मात्र चोरट्याला एटीएम मशीनमधील पैसे काढण्यात अपयश आले. सोमवारच्या सकाळी हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलीसांनी एका संशयीताला ताब्यात घेतले असून ल त्याची चौकशी सुरु आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment