चोरीच्या कारसह चोरट्यास अटक

On: March 15, 2023 10:24 PM

जळगाव : घरासमोर उभी असलेली कार चोरुन नेणा-या चोरट्यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अब्दुल रहेमान शहाबुद्दीन शेख (37) रा. धारावी झोपडपट्टी मुंबई असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

21 फेब्रुवारीच्या रात्री कारमालक बबनराव सर्जेराव थोरवे यांनी त्यांच्या मालकीची कार त्यांच्या अयोध्या नगर परिसरातील घरासमोर उभी केली होती. दुस-या दिवशी त्यांची स्विफ्ट डिझायर कार त्यांना घरासमोर दिसली नाही. याबाबत त्यांनी शोध घेतला असता ती कार कुठेही आढळून आली नाही. अखेरीस त्यांनी कार चोरीची तक्रार एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल केली.

या गुन्ह्याच्या तपासाअंती पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक फौजदार अतुल वंजारी,  पोलीस नाईक इमरान सय्यद, सचिन पाटील, योगेश बारी आदींनी अब्दुल रहेमान शेख यास अटक केली. त्याच्याकडून चोरीची कार हस्तगत करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अब्दुल शेख यास न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment