जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आंतर जिल्हा मुलींच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलींचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक १९ मार्च २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजता जैन स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर (विद्या इंग्लिश स्कूल मागे) ही निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.
इच्छुक सर्व मुलींनी या निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन जळगांव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन, सचिव श्री अरविंद देशपांडे, सहसचिव श्री अविनाश लाठी यांनी कळवले आहे.