जळगाव : जळगाव शहरात टोळीने गुन्हे करणा-या तिघा गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. किरण अनिल बाविस्कर, आकाश सुरेश बर्वे आणि महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत (तिघे रा. गेंदालाल मिल जळगाव) अशी हद्दपार करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
या तिघांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला टोळीने केलेले नऊ गुन्हे दाखल आहेत. जळगाव शहरासह परिसरात त्यांनी पसरवलेल्या दहशतीमुळे नागरिकांच्या जीवीतासह जंगम मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यांच्या वर्तनात सुधारणा होण्याच्या दृष्टीने त्यांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.