जळगाव : जळगाव येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे अंतर्गत वरिष्ठ गटाच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आहे. काल व आज जळगाव संघाचा साखळी सामना परभणी यांच्या दरम्यान खेळण्यात आला. सामन्याची नाणेफेक जळगाव जिल्हा क्रिकेट अससिएशनचे उपाध्यक्ष श्री एस. टी. खैरनार यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.
नाणेफेक जळगाव संघाने जिंकून परभणी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. कर्णधारचा निर्णय योग्य ठरवीत जळगाव गोलंदाजांनी परभणी संघाला ३५.२ षटकात केवळ १२१ धावात बाद केले त्यात सम्राट राज ४० सौरभ शिंदे १८ धावा केल्या गोलंदाजीत जळगांव संघा तर्फे जेसल पटेल ५ सौरभ सिंग ३ आणि ऋषभ कारवा यांनी २ गडी बाद केले प्रतिउत्तरात जळगांव संघाने आपले पहिला डाव ६७ षटकात ७ गडी बाद ३८२ धावावर घोषीत केला आणि २६१ धावांची महत्वपूर्ण अशी विजयी आघाडी घेतली त्यात कर्णधार वरुण देशपांडे याने शतकी खेळी करून १३१ धावा केल्या त्याला साथ देत निरज जोशी ८० आणि कुणाल फालक नाबाद ७५ धावा केल्या. गोलंदाजीत परभणी संघा तर्फे शुभम कटारे २ मोहंमद युसूफ, सतीश बिराजदार आणि ओंकार मोहीते यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले
परभणी संघ २६१ धावांनी पिछाडीवर पडला व त्यांचा दुसरा डाव केवळ ३४.३ षटकात ७५ धावात गारद झाला त्यात पुरुषोत्तम खांडेभरद १७, सौरभ शिंदे १५ आणि एलिझा १३ धावा केल्या गोलंदाजीत जळगांव तर्फे राहुल निंभोरे ४ सौरभ सिंग यांनी २ गडी बाद केले आणि हा सामना जळगांव संघाने एक डाव आणि १८६ धावांनी जिंकला व बोनस गुणासहित ७ गुण प्राप्त केले. ह्या सामन्यात पंच म्हणून संदिप चव्हाण व घनःश्याम चौधरी आणि गुणलेखक मोहंमद फजल यांनी काम पहिले. विजयी संघाचे जळगाव जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल जैन व संपूर्ण कार्यकारणी मंडळाने अभिनंदन केले.